Search This Blog

Monday, 2 March 2026

जिवती तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन


 जिवती तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

चंद्रपूरदि. 03 : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनताशेतकरीविद्यार्थी  महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणेजनतेच्या तक्रारी निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुखकार्यक्षम  गतिमान करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्याबाबत राज्य शासनाने सुचना दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने जिवती तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून 7 मार्च 2026 रोजी शासकीय आश्रम शाळा पाटण येथे, 14 मार्च रोजी जिल्हा परिषद प्राशाळा टेकामांडवा येथे, 10 एप्रिल रोजी शासकीय आश्रम शाळा पाटण येथे, 17 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राशाळा टेकामांडवा, 8 मे रोजी विदर्भ कॉलेज जिवतीआणि 15 मे 2026 रोजी तहसील कार्यालय जिवती येथे सदर शिबिर घेण्यात येणार आहे.

तरी सर्व जनतेनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिवतीच्या तहसीलदार रुपाली मोगरकर यांनी केले आहे

००००००

No comments:

Post a Comment