Search This Blog

Wednesday, 11 March 2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कामाचे अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते लोकार्पण


 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कामाचे अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते लोकार्पण

Ø गावात एकोपा वाढवून लोकसहभागातून काम करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 11 : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ कामाचे लोकार्पण भारत गणेशपुरे यांच्या हस्ते भद्रावती तालुक्यातील सागरा येथे करण्यात आले. हे अभियान केवळ बक्षीसापुरते मर्यादित न राहता, गावा-गावात एकोपा वाढून लोकसहभागातून काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केले.

            कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) गिरीश घायगुडे होतेयावेळी  गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळसहा.गट विकास अधिकारी डॉबंडु आकनुरवारसंजय नैतामग्रामपंचायत प्रशासक शंकर रासेकरमंगेश भोयरसुधाकर रोहणकरप्रदीप महाकाळकरएकनाथ घागीमनिषा रोडेछाया जंगम उपस्थित होते.

प्रथम लेझीम आणि भजन दिंडीच्या गजरात स्वागत झाल्यानंतर दीप प्रजल्वन मालार्पण करण्यात आलेअभिनेता भारत गणेशपुरे यांच्यासह या अभियानात नाविन्यपूर्ण उपक्रमात लोकसहभाग व वर्गणीतून उभारण्यात आलेले गोरक्षणसार्वजनिक सभागृह, स्मशानभुमीनिराधार गृहव्यायाम शाळाजि.. शाळा बांधकामाच्या वर्गखोल्यांना भेटी देऊन लोकार्पण करण्यात आलेयावेळी मराठी अभिनेते भारत गणेशपुरेगिरीश घायगुडे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत नावीन्यपूर्ण उपक्रमासह आठ मुद्यावर सविस्तर मार्गदर्शन केलेघेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी केलेसंचालन भारती उरकांदे तर आभार विस्तार अधिकारी प्रणाली भागवत यांनी मानलेयावेळी ग्रामपंचायत अधिकारी सुशील शिंदेग्रामस्थ,पंचायत समितीग्रामपंचायत अधिकारी तसेच तालुक्यातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment