Search This Blog

Monday, 23 March 2026

24 मार्च रोजी उद्योजक मेळावा तसेच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 

24 मार्च रोजी उद्योजक मेळावा तसेच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

चंद्रपूर, दि. 23 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, डॉ.आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस  अॅन्ड सायन्स आणि दे-आसरा फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 24 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता उद्योजक मेळावा तसेच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ आर्टस अॅन्ड सायन्स चंद्रपूर येथे करण्यात येत आहे

जिल्ह्यातील 10 वी, 12 वी  आय.टी.आय. पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे

सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 200 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये  वैभव इंटरप्रायझेस, नागपुर विदर्भ क्लिक वन सोल्युशन चंद्रपुर, संसूर सृष्टी इंडिया प्रा.लि. चंद्रपूर, व्ही.आर. इंटरप्रायझेस, चंद्रपुर इत्यादी कंपन्याचे विविध रिक्त पदे असल्याचे नियोक्ते यांच्याकडून कळविण्यात आले आहे. मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172- 252295 येथे संपर्क करावा.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याकरीता तसेच प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी उद्योगजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचीत करावी. उमेदवारांनी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भाग घेण्याकरीता सदर पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment