Search This Blog

Tuesday, 24 March 2026

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती रॅली




जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती रॅली

चंद्रपूरदि. 24 :   जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज (दि.24) जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर येथून क्षयरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेसदर रॅलीचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेसर्वप्रथम डॉरॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला मालार्पण करून टीबी मुक्त भारत अभियान 100 दिवस क्षयरोग मोहिमेचे फित कापून उद्घाटन केले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉललीतकुमार पटलेजिल्हा हिवताप अधिकारी डॉप्रकाश साठेचेस्ट फिजीशियन डॉसौरभ राजुरकरवैद्यकीय अधिकारी डॉप्रिती राजगोपालडॉमाधुरी टेंभेडॉवैभव आगलावे यांच्यासह शासकीय नर्सिंग महाविद्यालय येथील जिल्हा क्षयरोग केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रॅली समाप्तीनंतर जिल्हा क्षयरोग केंद्र येथे 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेसदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आय.एम.चे सहसचिव डॉअप्रतिम दीक्षित उपस्थित होतेयावेळी डॉदीक्षित यांनी फुप्फुसांव्यतिरीक्त  इतर अवयवांमध्ये होणाऱ्या क्षयरोगाबद्दल माहिती दिलीकार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉललीतकुमार पटले यांनी क्षयरोगाबाबत विस्तृत माहिती दिली.

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत डॉअप्रतिम दिक्षीत यांनी क्षयरुग्णांना पोषण आहार किट दिलीकार्यक्रमाचे संचालन हेमंत महाजन व आभार डॉतेजस्विनी ताकसांडे यांनी मानले.

०००००००

No comments:

Post a Comment