Search This Blog

Tuesday, 10 March 2026

चंद्रपुरात 12 मार्चला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके जयंती व आदिवासी लोककला महोत्सव


 चंद्रपुरात 12 मार्चला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके जयंती व आदिवासी लोककला महोत्सव

चंद्रपूरदि. 10 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयचंद्रपूर यांच्या वतीने क्रांतिवीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांची जयंतीआदिवासी मेळावा तसेच भव्य आदिवासी लोककला महोत्सव’ गुरुवार12 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता वीर बाबूराव शेडमाके शहीद स्मारक (मध्यवर्ती कारागृह परिसर)गिरणार चौकचंद्रपूर येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने या महोत्सवात पारंपरिक आदिवासी लोककला आणि वाद्यांचे सादरीकरण होणार आहे. यानिमित्ताने लोककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून विविध आदिवासी पथके आपल्या पारंपरिक कला सादर करणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या पथकांना आकर्षक रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. यात प्रथम पारितोषिक 50 हजार रुपयेद्वितीय पारितोषिक 40 हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक 30 हजार रुपये असेल. तसेच 10 हजार रुपयांची दोन प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येणार असून प्रत्येक सहभागी पथकास 5 हजार रुपये प्रवास भत्ता दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक  उईके उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवात प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी व नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्याला उपस्थित राहावेअसे आवाहन प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर विकास राचेलवार यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment