Search This Blog

Thursday, 12 March 2026

आनंदवन वरोरा येथे शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन





 

आनंदवन वरोरा येथे शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

Ø जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने 12, 13 आणि 14 मार्च पर्यंत आयोजन

चंद्रपूरदि. 06 : राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावीतसेच या योजनांचा त्यांना लाभ मिळावाया उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आनंदवनवरोरा येथील मुख्यमंत्री सभागृहात तीन दिवसीय शासकीय योजनांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेया प्रदर्शनाचे उद्घाटन वरोराचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या हस्ते गुरुवारी आज (दि.12) करण्यात आले.

यावेळी वरोराचे तहसीलदार योगेश कौटकरआनंदवनच्या अंतर्गत व्यवस्थापन विश्वस्त पल्लवी आमटेजिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकरआनंदवनचे जनसंपर्कअधिकारी राजेश ताजणेवाचा उपचार तज्ज्ञ रविकांत घोलप तसेच विद्यार्थी  नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीभस्के म्हणालेराज्य शासनाच्या सुचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहेत्याचाच एक भाग म्हणून 12 ते 14 मार्च या कालावधीत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासकीय योजनांचे प्रदर्शन येथे आयोजित करण्यात आले आहेयाच ठिकाणी 14 मार्च रोजी महाराजस्व शिबीराचेसुध्दा आयोजन आहेनागरिक  विद्यार्थ्यांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले.

आनंदवनच्या विश्वस्त पल्लवी आमटे म्हणाल्यानागरिकांसाठी शासनाच्या चांगल्या योजना आहेतयात रोजगाराच्याउद्योगासंबंधी माहितीसुध्दा आहेशासकीय योजनांच्या माध्यमातून सरकार मदत देण्यास तयार आहेत्याचा लाभ नागरिकांनी घ्यावायोजनांचा फायदा झाला तर आयुष्य उभे राहू शकतेआनंदवन नेहमीच अशा उपक्रमात सहभागी राहिले आहेअसे त्यांनी सांगितले.

तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलेकार्यक्रमाचे संचालन रविकांत घोलप यांनी तर आभार जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी मानलेसदर प्रदर्शन हे मुख्यमंत्री सभागृहआनंदवनवरोरा येथे 12, 13 आणि 14 मार्च पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत नागरिकांसाठी उपलब्ध आहेपरिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment