Search This Blog

Thursday, 12 March 2026

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त आदिवासी मेळावा उत्साहात




 

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त आदिवासी मेळावा उत्साहात

चंद्रपूरदि. 12 : क्रांतिवीर बाबुराव  शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयचंद्रपूर यांच्या वतीने गुरुवारी भव्य आदिवासी मेळावाआरोग्य शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे जतन करत क्रांतिवीरांच्या गौरवशाली कार्याची आठवण जागवण्यात आली.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता राजेंद्र खांडेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग तसेच अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडेप्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते.

व्यासपीठावर नगरसेविका सुशिला सिडामसरला कुळसंगेनगरसेवक कुलमेथेशहर ठाणेदार रामटेकेॲड. संतोष कुळमेथेमीनाताई आत्राममहिपाल मडावीप्रतिक कुळसंगेअरुण मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात शेकडो नागरिकांची सिकलसेल तपासणीमधुमेहरक्तदाब तसेच दंत तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य व गीतांच्या सादरीकरणातून आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले. उपस्थित मान्यवरांनी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास सांगत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले.

प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यात वीर बाबुराव शेडमाके स्मारक समितीच्या अध्यक्षा शशिकला उईकेविलास मसरामआदिवासी सेवक डी. के. आरिकरअखिल भारतीय आदिवासी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा मसरामजनार्दन गोडामभारत आत्रामप्रेमदास मेश्रामविजय कुमरेमधुकर कोटनाकेप्रमोद कोडपेप्रतिक कुलसंगेशुभम मडावी यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

००००००

No comments:

Post a Comment