Search This Blog

Wednesday, 11 March 2026

कारागृहात दिव्यांग कलावंतांनी सादर केला संगीतमय कार्यक्रम




कारागृहात दिव्यांग कलावंतांनी सादर केला संगीतमय कार्यक्रम

चंद्रपूरदि. 11 :   कारागृहातील गुन्हेगारांच्या विचारसरणीत व वर्तणुकीत सुधारणा करून समाजात त्यांचे योग्यप्रकारे पुनर्वसन करण्याकरीता विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतातयाच उपक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा कारागृहात महारोगी सेवा समितीआनंदवन येथील दिव्यांग कुष्ठमुक्त कलावंतांचा 'स्वरानंदवन वाद्यवृंदकार्यक्रम सादर करण्यात आला.

प्रमुख अतिथी म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णीजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवेचंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक अनुपकुमार कुमरेऑर्केस्ट्राचे प्रमुख व्यवस्थापक सदाशिव ताजनेअंतर्गत व्यवस्थापन समिती सदस्य सुधाकर कडुराजेश ताजनेआनंदवनचे प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात जय मा सरस्वती या गीताने झालीसति व निशा यांनी सूया घे गं दाभन घे’ हे गीत सादर करून बंद्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केलेयावेळी विविध हिंदी चित्रपटांची गाणीसुध्दा सादर करण्यात आलीनिशाउज्वलासुषमाबैनाबाई आदी दिव्यांग कलावंतांनी हिंदीमराठीतेलगु भाषेतील उत्कृष्ट गीत व नृत्य सादर करून उपस्थित बंदी बांधवांचे मन जिकंलेतसेच मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी कानडा राजा पंढरीचा हे गीत सादर करून कारागृहातील बंद्याना भक्ती गीतामध्ये तल्लीन केलेयावेळी  तुरुंगाधिकारी श्रेणी-1 यांनी कमलाकर मिराशे यांनी मागतो मी पांडुरंगा हेची एक दान हे गीत गायन केले.

कार्यक्रमाचे संचालन संजीव हटवादे व श्रीमती शमा पठाण यांनी केले. यावेळी कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी सतिश सोनवणेकमलाकर मिराशेमिलींद बनसोडप्रकाश लोमटेसंजीव हटवादेशिक्षक रविंद्र वांढरेविजय माल्टेसुभेदार महेंद्र हिरोळेसत्यानंद दुबेशिवशंकर खंडारेनरेंद्र दशमवारगुणवंत लखदिवेस्वप्निल भोयरपरेश जगनाडेमोहनिश महादुलेस्वाती शहारेकोमल बिरादारप्रिया तलांडेअश्विनी तुराणकरमिना मडावी व इतर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment