Search This Blog

Tuesday, 24 March 2026

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक श्रवण दिन


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक श्रवण दिन

चंद्रपूरदि. 24 :  कर्मवीर मा.सांकन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील कान-नाक-घसा विभागामार्फत जागतिक श्रवण दिन जनजागृतीपर उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आलाजागतिक आरोग्य संघटनेच्या संकल्पनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉमिलिंद कांबळेअतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉभास्कर सोनारकरवैद्यकीय अधीक्षक डॉनिवृत्ती जिवनेउपअधिष्ठाता डॉसुरपम उपस्थित होतेसर्व मान्यवरांनी जागतिक श्रवण दिनाचे महत्त्व अधोरेखित केलेअधिष्ठाता डॉकांबळे यांनीलहान वयात श्रवणदोषाचे निदान व कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट केले.

विभागप्रमुख डॉविपिन ईखार यांनीबालकांमधील श्रवणदोषाचे लवकर निदाननवजात श्रवण तपासणी व वेळेवर उपचार यांचे महत्त्व सांगितलेतसेच श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी युनिव्हर्सल स्क्रिनिंग कार्यक्रमकॉक्लिअर इम्प्लांट कार्यक्रमही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिलीकोणालाही ऐकण्यासंबंधी कोणतीही समस्या जाणवल्यास त्वरित विभागात येऊन तपासणी करून घ्यावी व उपलब्ध सर्व सुविधांचा लाभ घ्यावाअसे आवाहन ईएनटी विभागाने केले आहेविभागाच्या वतीने तृतीय वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी आयोजित पोस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाविजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन डॉशिवानी ढवस यांनी तर आभार सहाय्यक प्राध्यापक डॉकुणाल कापर्तीवार यांनी मानलेयावेळी समाजसेवा अधीक्षक उमेश आडेडॉआयुषी गुप्ताडॉअनुजा कोटकरडॉआसावरी देवतळे तसेच पदव्युत्तर विद्यार्थी डॉअंकिता आडसुळडॉक्षितिजा पाल्हाडे आणि ईएनटी विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉसचिन बिलवणे यांच्यासह सर्व प्राध्यापकनिवासी डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment