Search This Blog

Monday, 2 March 2026

7 मार्च पासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा

7 मार्च पासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा

चंद्रपूरदि. 02 : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या पुढाकारातून तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ या उपक्रमाचा पहिला टप्पा 7 मार्च पासून सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासन व महसूल विभागाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकशेतकरीविद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तात्काळ सोडविणे हा आहे. जनतेच्या तक्रारी त्वरीत निकाली काढून महसूल सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणेमहसूल प्रशासन अधिक लोकाभिमुखकार्यक्षम व गतिमान करणे हे या उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे.

 मार्च ते मे २०२६ या कालावधीत चंद्रपूर तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ तसेच नगर परिषद/नगरपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

 ७ मार्च रोजी सकाळी १० वा. – ग्रामपंचायत कार्यालयअजयपूर

१४ मार्च रोजी सकाळी १० वा. – स्नेहप्रभा मंगल कार्यालयघुग्घुस

१० एप्रिल रोजी सकाळी १० वा. – लोकसेवा मंगल कार्यालयपडोली

१७ एप्रिल रोजी सकाळी १० वा. – जिल्हा परिषद शाळाचिंचाळा

८ मे रोजी सकाळी १० वा. – खत्री महाविद्यालयचंद्रपूर आणि

 १५ मे २०२६ रोजी सकाळी १० वा. – तहसील कार्यालयचंद्रपूर येथे समारोप होईल.

या अभियानांतर्गत महसूल विभागाच्या १५ पेक्षा अधिक प्रमुख सेवा थेट शिबिरस्थळी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे७/१२ मधील त्रुटी दुरुस्तीडिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८-अ उतारे वाटपउत्पन्नरहिवासीजात व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रेअकृषक तरतुदीबाबत मार्गदर्शनसनद प्रक्रियेची माहितीसामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभविद्यार्थ्यांसाठी विविध दाखलेतुकडेबंदी कायद्यावरील प्रकरणांचा निपटारापाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यताघरकुल पट्टे वाटपई-मोजणी अर्ज निकाली काढणेअॅग्रीस्टॅक व पी.एम. किसान नोंदणीभूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणे आदी सेवांचा समावेश आहे.

तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नवीन तरतुदींची जनजागृती व प्रभावी अंमलबजावणीडिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

नागरिकांनी संबंधित शिबिरस्थळी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावाअसे आवाहन तहसील कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालयचंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment