Search This Blog

Sunday, 1 March 2026

अहंकारातून अहं-शून्यतेकडे… खारघरमधील ‘जूता घर’ ठरले सेवाभावाचे प्रतीक

 



अहंकारातून अहं-शून्यतेकडे… खारघरमधील

 ‘जूता घर’ ठरले सेवाभावाचे प्रतीक

 

नवी मुंबईदि.१ : हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त खारघरनवी मुंबई  येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमासाठी लाखो भाविक उपस्थित राहणार असल्याने नियोजन अत्यंत बारकाईने करण्यात आले.

 या नियोजनाचा एक अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक भाग म्हणजे कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेले जूता घर’ भाविकांची पादत्राणेबूट व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रवेशद्वाराजवळच डाव्या आणि उजव्या बाजूस उभारण्यात आलेले हे ‘जूता घर’ चार विभागांत विभागलेले असून त्याची क्षमता जवळपास दहा हजार पादत्राणे ठेवण्याची आहे.

 प्रत्येक विभागनिहाय नियोजनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून शिस्तबद्ध सेवा सुनिश्चित करण्यात आली आहे. परंतु हे केवळ पादत्राणे ठेवण्याचे ठिकाण नाहीतर हे आहे अहंकारातून अहं-शून्यतेकडे नेणाऱ्या प्रवासाची सुरुवात.

अहंकार कमी करण्याच्या भावनेतून अनेक भाविक स्वतःहून येथे सेवा देतात. इतरांची पादत्राणे नीट लावणेत्यांची काळजी घेणेहरवू नयेत म्हणून दक्ष राहणे. ही केवळ व्यवस्था नाहीही नम्रतेची साधना आहे. सेवेतून आत्मिक समाधान मिळतेआणि मीपणाचा अंश हळूहळू विरघळत जातो.

मलाडनेरुळ तसेच गुरु तेग बहादूर नगर येथील सेवक या जूता घरात अहोरात्र सेवा बजावत आहेत. हजारो भाविकांच्या ये-जा मध्येही त्यांच्या चेहऱ्यावर समाधानडोळ्यांत भक्ती आणि मनात समर्पण दिसून येते.

या सेवेमुळे कार्यक्रमस्थळावर शिस्तस्वच्छता आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिथे पादत्राणे काढली जाताततिथेच अहंकारही उतरवला जातो आणि खरी भक्ती तेव्हाच सुरू होते. हा आधात्मिक संदेशच जणू इथे जोपासला आहे.

००००

No comments:

Post a Comment