Search This Blog

Sunday, 29 March 2026

उष्माघात नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा

 



उष्माघात नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा

Ø पालकमंत्र्यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश ;

Ø नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 29 : गत पंधरवड्यापासून जिल्ह्यात दैनंदिन तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम थेट मानवी शरीरावर होत असून योग्य काळजी घेतली नाही तर उन्हाच्या तिव्रतेमुळे कधीकधी मृत्युही होऊ शकतो. त्यामुळे उष्माघात नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने प्रभावी उपाययेाजना कराव्यातअसे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. नागरिकांनीसुध्दा उन्हापासून संरक्षणासाठी योग्य दक्षता घ्यावीअसे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. 28) उष्माघात नियंत्रण कृती आराखडाबाबत आयोजित बैठकीत डॉ. वुईके बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त अकुनूरी नरेशअपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारेमहावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे आदी उपस्थित होते.

उष्माघाताबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहेअसे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणालेउष्माघाताची लक्षणेघ्यावयाची काळजीकाय करावेकाय करू नये आदी बाबी नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. उष्माघाताबाबत संपर्क करायचा असल्यास जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक व उष्माघात संपर्क अधिकाऱ्यांची यादी सुद्धा नागरिकांपर्यंत पोहचवा. जिल्हा सामान्य रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयग्रामीण रुग्णालयप्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांसाठी राखीव खाटारेफरल साठी रुग्णवाहिकेची उपलब्धताकुलरसह थंड खोलीची उपलब्धतापिण्याच्या पाण्याची व्यवस्थाओआरएस व औषधीसाठा उपलब्ध ठेवावाअशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

उष्णतेची लाट : जागतिक हवामान संघटनेनुसार सलग पाच दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस दररोज कमाल तापमानसरासरी कमाल तापमानापेक्षा 5 अंश सेल्सीअसने जास्त असतेतेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात. मैदानी भागात तापमान किमान 40 अंश किंवा त्यापेक्षा जास्त असेलतर उष्णतेची लाट मानली जाते.

उष्णतेच्या लाटेसंबंधी आजाराची लक्षणे : 1) चक्कर येऊन पडणे2) फेफरे किंवा झटके येणे3) झोपेतून उठण्यास त्रास होणे / उठता न येणे4) गोंधळल्यासारखे बोलणे / वागणे5) श्वासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे6) शरीराचे तापमान 105 अंश फॅरनहिट (40.5 अंश सेल्सिअस) पेक्षा अधिक होणे7) स्नायुत पेटके येणे8) चिडचीड होणे9) डोकेदुखीअशक्तपणा येणे10) मळमळ व उलटी होणेअधिक घाम येणे.

काय करावे : 1) शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे2) डोक्यावर टोपीरुमालटॉवेल किंवा छत्री वापरावी3) उन्हात बाहेर जातांना डोळ्यावर गॉगल्स लावावा4) कष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी कमी तापमानात करावी.

काय करू नये :  1) दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर उन्हात जाणे टाळावे2) उन्हात अतिकष्टाची कामे करू नये3) दारूचहाकॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये4) गडद घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे5) उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खावू नये.

येथे करा संपर्क : उष्माघाताबाबत संपर्क करावयाचा असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूर कॉल सेंटर दूरध्वनी क्रमांक 07172 – 250400.

०००००००

No comments:

Post a Comment