Search This Blog

Wednesday, 11 March 2026

आनंदवन वरोरा येथे तीन दिवसीय शासकीय योजनांची छायाचित्र प्रदर्शनी

 

आनंदवन वरोरा येथे तीन दिवसीय शासकीय योजनांची छायाचित्र प्रदर्शनी

Ø 12, 13 व 14 मार्च रोजी आयोजन

चंद्रपूरदि. 11 :   राज्य शासनाच्या कल्याणकारी शासकीय योजनांची प्रचार व प्रसिध्दी व्हावीनागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी व त्याचा लाभ घेता यावाया उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आनंदवन वरोरा येथे छायाचित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे.

सदर प्रदर्शनी ही आनंदवन येथील मुख्यमंत्री सभागृह येथे दि. 12, 13 व 14 मार्च या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी वाजेपर्यंत नागरिकांसाठी उपलब्ध राहील. 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता वरोराचे उपविभागीय अधिकारी डॉसंदीप भस्के यांच्या हस्ते व तहसीलदार योगेश कौटकरआनंदवन च्या अंतर्गत व्यवस्थापन प्रमुख डॉपल्लवी आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. 14 मार्च रोजी आनंदवन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजनसुध्दा करण्यात येणार आहेया तीन दिवसीय प्रदर्शनीचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment