Search This Blog

Sunday, 1 March 2026

गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश



 गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश

 

 नवी मुंबईदि. २८ (विमाका):-  गृहमंत्री अमित शाह यांनी खारघरनवी मुंबई येथे आयोजित हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रम दरम्यान स्वतः लंगरमध्ये संत महंताना भोजन वाढून सेवा दिली.   ‘सेवा हीच खरी श्रद्धा’ या शीख परंपरेचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भोजन वाढून लंगर सेवा दिली.

            कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सुरू असून सर्वधर्मीय भाविकांसाठी विनामूल्य भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ ठिकाणी सुरू असलेल्या लंगरमध्ये हजारो स्वयंसेवक सेवा बजावत आहेत. भाई जैताजी लंगर सेवाराधास्वामी ब्यास लंगर सेवाबाबा मक्खन शाह लबाना लंगर सेवासंत सेवालाल महाराज लंगर सेवाबाबा दीप सिंघा ब्यास लंगर सेवाभगवान झुलेलालजी लंगर सेवाभाई मतीदासजी लंगर सेवा या आठ सेवादार लंगरमध्ये पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी लंगरचा लाभ घेतलातर दुसऱ्या दिवशी हा प्रतिसाद अधिक वाढला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या समागम कार्यक्रमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या पावन उपस्थितीत कीर्तन व धार्मिक कार्यक्रम सुरू होते. वाहे गुरु आणि बोले सो निहालसत श्री अकालच्या जयघोषात भाविकांनी दर्शन व लंगर सेवेचा लाभ घेत घेतला.

लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समताबंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः लंगर  सेवा देत या परंपरेचा सन्मान केला. ‘हिंद-दी-चादर’ समागमातून सामाजिक ऐक्य आणि एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला.

०००

No comments:

Post a Comment