Search This Blog

Monday, 30 March 2026

ठेवी परत मिळण्याकरीता अर्ज भरून देण्याचे आवाहन

 ठेवी परत मिळण्याकरीता अर्ज भरून देण्याचे आवाहन

Ø एनएक्सजी कॉईन प्रालिमिफसवणूक प्रकरण

चंद्रपूरदि. 30 : एनएक्सजी कॉईन एस.डीहब (ओपीसीप्रालिमिटेड मध्ये गुंतवणूक सांगून आयडी तयार करण्याकरीता 50 हजार रूपये व महिंद्रा एक्सयुव्ही 300 वाहन देण्याचे खोटे आमिष दाखवून आरोपी रमेश सखाराम भाष्करमंगलदास तुलाराम वरखडे यांनीफिर्यादी कार्तीक रमेश खंगार इतर गुंतवणुकदारांची 14 लक्ष  रूपयाची आर्थिक फसवणुक केल्याबाबतचा गुन्हा पोलिस स्टेशन रामनगर येथे नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर करीत आहे.

आरोपीच्या चौकशीमध्ये चंद्रपुर जिल्हयातील गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवून फसवणूक केल्याचे कबूल केले आहेतरी गुंतवणूकदाराची ठेवी परत करण्याकरीता महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधिल हितसंबंधांचे सरंक्षणअधिनियम सन 1999 अन्वये कार्यवाही करीता एनएक्सजी कॉईनएस.डीहब (ओपीसीप्रालिमिटेड या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या ठेवी परत मिळण्याकरीता आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथे वैध दस्ताऐवजासह ठेवी परत मिळण्याचा फार्म भरून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनअपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडेउपविभागीय पोलिस अधिकारी तथा आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी प्रमोद चौगुलेयांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अभिषेक बागडेपोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर श्रीरामेपोलिस हवालदार प्रभाकर तलांडे हे करीत असून नमुद आरोपी रमेश सखाराम भाष्कर (वय 33 वर्षेरास्नेहनगर परळी वैद्यनाथ जिबीडआणि मंगलदास तुलाराम वरखडे, (वय 49 वर्षे), राहनुमान मंदीर जवळ लोहारा ताजिचंद्रपूर यांना अटक करण्यात आली आहे.

००००००

No comments:

Post a Comment