Search This Blog

Thursday, 12 March 2026

16 मार्च रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन


16 मार्च रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

चंद्रपूर,दि. 12 : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच महिलांच्या तक्रारी/अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येते. त्या अनुषंगाने 16 मार्च रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या महिलांचे तक्रार/निवेदन/अडचणीसमस्या वैयक्तीक स्वरुपाचे असतील, अशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसापुर्वी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीचंद्रपूर यांचे कार्यालयात दोन प्रतीत सादर करावे. 16 मार्च रोजी महिला लोकशाही दुपारी वाजता निवासी उपजिल्हाधिकारीतथा अपर जिल्हादंडाधिकारी, चंद्रपूर यांचे दालनात आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त पिडीत महिलांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी सदर महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment