Search This Blog

Thursday 8 June 2023

पंतप्रधान राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळावाचे 12 जुन रोजी आयोजन


पंतप्रधान राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळावाचे 12 जुन रोजी आयोजन

 चंद्रपूरदि. 08 : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व नॅशनल करीअर सर्विसेसचंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 जुन 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रचंद्रपूर येथील कौशल्य बलम् सभागृहात सकाळी 10 वाजता पंतप्रधान राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर मेळाव्यामध्ये अशोक लेलॅंडफायब्रोटफलक्ष्मी अग्नी पुणेजय महाराष्ट्र करीअर सर्विसेसआदी कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.  या मेळाव्यात शिकाऊ उमेदवारांची (ट्रेनी) निवड करण्यात येणार आहे. सदर मेळाव्यामधून 10वी12वीआयटीआय मुख्यता टर्नरफिटर,मशिनिस्टग्रांइडरसिएनसी-व्हीएमसी ऑपरेटरएमसीव्हीसी-सिएमसी-व्हीएमसी कोर्सबीपीएल कोर्स कमवा व शिकाकारपेंटर,  डिझेल मेकॅनिकमोटार मेकॅनिक आदी कोर्सच्या उमेदवारांकरीता रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. 

उमेदवारांनी मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdJ53x4kQX7zAcXfgq7cCzkF51dn7kIn2bmxX7VesccF0gZQ/viewform?usp=sflink किंवा ncs.gov.in आणि www.rojgar.mahaswayam.gov.inलिंक / पोर्टलचा उपयोग करून नोंदणी करावी.

         या अप्रेंटिसशिप मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होवुन संधीचा  लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमेऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रविद्र मेंहेदळे यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment