योजनेंतर्गत 802 रुग्णांवर 3902 वेळा केमोथेरपी उपचार
Ø जुने व नवीन रुग्णांना पुरविण्यात आलेल्या केमोथेरपी सायकल केसेसची संख्या
चंद्रपूर, दि. 27 : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वर्ष 2022 ते 23 पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 42 कॅन्सर रुग्णांची नोंद आहे. एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सर रुग्णांवर मेडिकल ओंकोलॉजी या स्पेशलिटी अंतर्गत 2022 ते जून 2023 पर्यंत जुने व नवीन अशा 802 रुग्णांवर 3902 वेळा केमोथेरपी उपचार करण्यात आला आहे.
कॅन्सर रुग्णांना साधारणपणे 4 ते 6 वेळा उपचाराकरीता केमोथेरपी सायकलची आवश्यकता असते. सदर 802 रुग्णांनी या योजनेअंतर्गत 3902 केमोथेरपी सायकलकरीता उपचार घेतला आहे. तसेच 3902 हे कॅन्सर रुग्ण नसून योजनेअंतर्गत जुने उपचाराधीन आणि नवीन रुग्णांना पुरविण्यात आलेल्या एकूण केमोथेरपी सायकल केसेसची संख्या आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांनी कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment