Search This Blog

Tuesday 6 June 2023

तंबाखूचे व्यसन सोडा, सुदृढ आरोग्याशी नाते जोडा



तंबाखूचे व्यसन सोडा, सुदृढ आरोग्याशी नाते जोडा

Ø आरोग्य विभागाचे जनतेला आवाहन

चंद्रपूर, दि. 6 : तंबाखूचे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरतर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम. यांनी हिरवी झेंडी दाखवून केली.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम तसेच युवा पिढीला या व्यसनापासून दूर करणे या उद्देशाने सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा सामान्य रुग्णालय पर्यंत काढण्यात आली. रॅलीमध्ये ‘आम्हाला अन्न हवेतंबाखू नको’, ‘तंबाखू सुपारीचे व्यसन सोडासुदृढ आरोग्याची नाते जोडा’, ‘एकमेकांची साथ देऊ यातंबाखूचा नाश करू या’ अशा घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेअति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारेअतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकरवैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉद्य हेमंत कन्नाकेवैद्यकीय अधिकारी डॉद्य बंडू रामटेके, दंत शल्यचिकित्सक डॉ.आकाश कासटवार,  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकरसमुपदेशक मित्रांजय निरांजणेतुषार रायपुरे तसेच आरोग्य विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारीशासकीय नर्सिंग कॉलेजप्रभादेवी नर्सिंग कॉलेजझाडे नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

००००००००

No comments:

Post a Comment