Search This Blog

Monday, 5 June 2023

350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार


350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार

Ø सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Ø राज्यपालमुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी अनावरण

मुंबई / चंद्रपूर दि. 5 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात  वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक टपाल तिकीट  काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवार दि. 6 जून रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉलमध्ये  समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारपर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढाशिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरपोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडेप्रधान सचिव विकास खारगेराज्यपालांचे सचिव संतोषकुमार  प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

'छत्रपती शिवाजी महाराजअसा जयघोष हा आमच्यासाठी चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय महाराष्ट्र सरकारने घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला, असे श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

 शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा महाराष्ट्र शासनाचा विचार असून माँ जिजाबाई यांची यामागील भावनासंकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे. महाराजांच्या काळातील नाणीगडकिल्लेअष्टप्रधान मंडळ प्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहे या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात पुढे सरसावला आहे.  अस्मानी पातशाह्यांना टक्कर देणारे आणि स्वतःच्या जोरावर स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी हे  महान राजे खरे  नायक आहेत हे भावी पिढीलासुद्धा कळावे ही यामागील भावना आहे, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन : टपाल तिकीट अनावरण कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने शिववंदना या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment