Search This Blog

Friday 23 June 2023

24 जून रोजी ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत ग्रामपंचायतींची आढावा सभा


24 जून रोजी ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत ग्रामपंचायतींची आढावा सभा

चंद्रपूर, दि. 23 : चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत ताडाळी, छोटा नागपूर, नागाळा सी., नकोडा, उसगाव, पडोली, कोसारा, मोरवा, बेलसनी, म्हातारदेवी, साखरवाही, धानोरा, पिपरी, दाताळा, देवाडा, वेंडली, सिदूर, पांढरकवडा, शेणगाव, सोनेगाव, वढा, मारडा, येरुर, विचोडा (रै.) इत्यादी ग्रामपंचायतींची आढावा सभा ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत 24 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.

नियोजन भवन येथे सकाळी 10 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment