पोलीस पाटील पदभरती करीता पात्रताधारक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित
Ø उमेदवाराची त्या गावात जमीन किंवा स्थावर मालमत्ता असावी ही अट रद्द
चंद्रपूर, दि. 05 : उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील रिक्त झालेली पोलीस पाटील पदे तात्पुरता स्वरूपात भरण्याकरीता पात्रताधारक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासोबतच जाहीरनाम्यात नमूद केलेल्या पात्रतेमध्ये उमेदवाराची त्या गावात जमीन असावी किंवा स्थावर मालमत्ता असावी, अशी अट वगळण्यात येत आहे. तथापि, उमेदवार त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असावा याकरीता तलाठी व ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला अर्जासोबत जोडण्यात यावा, असे पोलीस पाटील निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
पोलीस पाटील पदाकरीता उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 25 ते 45 असावे. सुदृढ शरीरयष्टी असावी. उमेदवार स्थानिक रहिवासी असावा.
पदभरतीकरीता तालुक्यातील गावांची नावे :
नकोडा, पांढरकवडा, बोर्डा( इंदा), डोनी, झरी, जांभरला अडेगांव, चक बोर्डा, महादवाडी, धानोरा, पिपरी, वढा, शेनगांव, सिदूर, शिवनीचोर, गोंडसावरी, ताडाळी, वढोली, नागाळा(म), लोहारा, चक वायगांव, देवाडा, चोराळा या गावामध्ये पोलीस पाटीलची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
पोलीस पाटील भरती प्रक्रियेचा कार्यक्रम:
29 मे 2023 रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करणे, 15 जून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख. 17 ते 21 जून पर्यंत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना परीक्षेकरीता प्रवेशपत्र देण्यात येईल. लेखी परीक्षेचा दि.25 जून रोजी सकाळी 11 ते 12 पर्यंतच्या कालावधीत घेण्यात येईल. 27 जून रोजी लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करणे. 29 जून ते 2 जुलै 2023 पर्यंत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मौखिक परीक्षेकरीता उपस्थित राहण्यास पत्र देणे. 5 जुलै रोजी मुलाखत तर 10 जुलै रोजी अंतिम निकाल जाहीर करून नियुक्तीपत्र पाठविणे. असा पोलीस पाटील भरती प्रक्रियेचा कार्यक्रम असणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
०००००००
No comments:
Post a Comment