नागरी सह. पतसंस्थेच्या नोंदणी संदर्भातील हरकती 30 जूनपर्यंत आमंत्रित
चंद्रपूर, दि. 26 : जीवन आधार अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटी लि. चंद्रपूर या संस्थेचा चंद्रपूर तालुका कार्यक्षेत्र असलेला नोंदणी प्रस्ताव सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) चंद्रपूर या कार्यालयास प्राप्त झाला आहे. संस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयात 30 जून 2023 पुर्वी सादर कराव्यात. किंवा 30 जून 2023 रोजी दुपारी 12 वाजता सुनावणी ठेवण्यात आली असून सुनावणीच्या वेळी सदर हरकती दाखल कराव्यात. हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न झाल्यास संबंधितांना काही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment