इमारत मालकाकडून वस्तीगृहाकरीता इमारत किरायाने/भाड्याने देणेबाबत प्रस्ताव आमंत्रित
Ø 29 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 23 : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यांमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुलांसाठी 18 व मुलींसाठी 18 असे एकूण 36 शासकीय वस्तीगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि. 28 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये शासनाने स्वतः वस्तीगृहासाठी इमारत भाड्याने घेऊन प्रत्येक जिल्ह्यात सदर प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनीकरीता वस्तीगृह कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने, सद्यस्थितीत जिल्ह्याच्या ठिकाणी मुला-मुलींसाठी प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृहे भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू करण्यासाठी इमारत मालकाकडून इमारत किरायाने/भाड्याने देण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
याप्रमाणे असावी इमारतीतील जागा:
विद्यार्थी निवासी दालन/कक्ष-4000 चौ. फुट, स्वयंपाकगृह-800 चौ. फुट, भोजनकक्ष-800 चौ. फुट, मनोरंजन/टीव्ही हॉल-300 चौ. फुट, वाचनालय-200 चौ. फुट, संगणक कक्ष-300 चौ. फुट, स्टोअररूम-500चौ. फुट, कार्यालय-300 चौ. फुट, गृहपाल निवासी-300 चौ. फुट, अभ्यासिका-200 चौ. फुट, स्वच्छतागृह-1000 चौ. फुट, अभ्यांगत कक्ष-200 चौ. फुट, पार्किंग/सायकल स्टॅन्ड-300 चौ. फुट याप्रमाणे इमारत भाड्याने द्यावयाची असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, शासकीय दूधडेअरी जवळ, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथील कार्यालयास दि. 29 जून पर्यंत सादर करावा किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment