मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती ई
चंद्रपूर, दि. 23 : चंद्रपूर जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष/स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस भरणे आवश्यक आहे. विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahawayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सदर माहिती सादर करणे बंधनकारक असून अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत आहे.
जुन 2023 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहि
सदरील जुन 2023 अखेरचे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. हे तिमाही विवरण विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे. तद्वतच प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील (Employer Profile) देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्यावत करावी. यासंदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास ई-मेल आयडी chandrapurrojgar@gmail.
००००००
No comments:
Post a Comment