Search This Blog

Monday 19 June 2023

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन


अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 19 :  महाकाली मंदिराच्या भिंतीलगत एक अनोळखी पुरुष मृत अवस्थेत आढळून आला आहे.  सदर अनोळखी मृत पुरुषाच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता तसेच मंदीर परीसरात, रेल्वे स्टेशन, बसस्टॉप, शहर परीसरात विचारपुस केली असता उपयुक्त माहिती मिळून आली नाही. सदर मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन चंद्रपूर, शहर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे :

सडपातळ बांधा, उंची 5 फूट 2 इंच, रंग सावळा वर्ण, केस काळे-पांढरे, चेहरा गोल, डोळे बारीक, कमरेला ब्राऊन रंगाचा बेल्ट, अंगात शेंदरी रंगाचा शर्ट, काळ्या रंगाचा फुलपॅन्ट परिधान केलेला आहे. तसेच उजव्या हातावर दि लमे बीकेपी व बाण काढून गोदविले आहे. या वर्णनावरून सदर मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment