Search This Blog

Wednesday 14 June 2023

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानचा आढावा

 



             

           ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानचा आढावा

चंद्रपूदि. 14 : ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली सदर अभियानचा आढावा घेण्यात आला.  

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जि.प. समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, डॉ. अविष्कार खंडाते, डॉ. हेमचंद कन्नाके, दिव्यांग प्रतिनिधी सुरेश पाझारे आदी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत दिव्यांगाना युडीआयडी प्रमाणपत्र व ओळखपत्र देणे, शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ योजना, नॉन क्रिमीलियर, अधिवास प्रमाणपत्र आदींचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, दिव्यांग बांधवांना सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शासकीय योजनांपासून जिल्ह्यातील कोणताही दिव्यांग बांधव वंचित राहू नये, त्यासाठी सर्व नगर परिषद / नगर पंचायत तसेच ग्रामपंचातींना पत्र लिहून दिव्यांगाचा डाटाबेस तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

०००००


No comments:

Post a Comment