पशुवैद्यकीय संस्थांना वाहनाद्वारे पुरवठा करण्यासाठी दरपत्रके आमंत्रित
चंद्रपूर, दि. 13 : जिल्ह्यातील 184 पशुवैद्यकीय संस्थांना 1 जुलै 2023 ते 30 जून 2024 या कालावधीसाठी द्रवनत्र व वीर्यामात्रा सुस्थितीत वाहनाद्वारे (टाटा 407 किंवा तत्सम) वाहतूक करण्याकरीता प्रतिकिलोमीटर दराने दरपत्रक मागविण्यात येत आहे. इच्छुक कंत्राटदारांनी दि. 14 ते 22 जून 2023 (शासकीय सुट्टीचे दिवस सोडून) या कालावधीत कार्यालयीन वेळेत आपली सीलबंद दरपत्रके जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, नगीनाबाग, चोरखिडकी, चंद्रपूर येथे सादर करावी. सिलबंद दरपत्रके 29 जून 2023 रोजी दुपारी 12 वाजता दरपत्रक समितीसमोर उघडण्यात येतील, असे जिल्हा पशुसवंर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे यांनी कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment