ज्ञानसंकुलातील अभ्यासक्रमाचे प्रवेश बुधवारपासून
एसएनडीटीच्या कुलगुरुंची घोषणा,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ
चंद्रपूर , दि. ४ : एसएनडीटी विद्यापीठाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस डिजीटल शाळेमध्ये स्थापन होत असलेल्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या ज्ञानसंकुलाचा शुभारंभ होणार आहे.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ग्वाही दिल्याप्रमाणे श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाचा (एसएनडीटी) अभ्यासक्रम चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहे. बुधवार, ७ जून २०२३ पासून या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी ना. श्री. मुनगंटीवार यांना पत्र पाठवत ही माहिती दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एसएनडीटी विद्यापीठाचे ज्ञान संकुल ना. श्री. मुनगंटीवार यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे डॉ. चक्रदेव यांनी पत्रात नमूद केले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस डिजिटल शाळेमध्ये विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे उद्घाटन होत असल्याने विद्यार्थी विश्वात आनंदाचे वातावरण आहे. ७ जून २०२३ ला ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होईल.
दिला शब्द केला पूर्ण !
हे केंद्र सुरू व्हावे यासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांनी अहोरात्र प्रयत्न केले. या ज्ञानसंकुलात १० अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. दहा कौशल्याधारित अभ्यासक्रमांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व तरुणींना रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार आहे. या केंद्राचे सत्र जून २०२३ पासून सुरू होईल, अशी ग्वाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यांनी दिलेला शब्द खरा करुन दाखविला अशी भावना परिसरातील नागरिकांत व्यक्त होत आहे.
000 000
No comments:
Post a Comment