विदर्भातील पाच जिल्ह्यामधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा 12 तास 3 फेज वीज पुरवठा होणार
◆ चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यांचा समावेश
◆ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मोठा दिलासा
चंद्रपुर, दि. 1: विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली , भंडारा , गोंदिया व नागपुर या पाच जिल्ह्यामधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाने दि. 30 नोव्हेंबर रोजीच्या पत्राद्वारे महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना आदेशित केले आहे.
विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली , भंडारा , गोंदिया व नागपुर हे पाच धान उत्पादक जिल्हे असून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करताना वन्यप्राण्यांचा धोका असतो. तसेच कृषी पंपासाठी 8 तासांच्या वीज उपलब्धतेमुळे धानपिकास पुरेशा प्रमाणात सिंचन होत नाही. कृषी पंपासाठी रोज 8 तासांच्या वीज उपलब्धतेऐवजी या जिल्ह्यातील कृषी पंपांना दिवसा 12 तास 3 फेज वीज पुरवठा करण्याची विनंती सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
उपमुख्यमंत्र्यांनी या विनंतीची त्वरित दखल घेत कृषी पंपांना दिवसा 12 तास 3 फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार 30 नोव्हेम्बर रोजी महावितरणला लेखी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना याबाबत त्वरित सूचित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली , भंडारा , गोंदिया व नागपुर या पाच जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
000000
Search This Blog
Friday, 2 December 2022
विदर्भातील पाच जिल्ह्यामधील कृषीपंप ग्राहकांना दिवसा 12 तास 3 फेज वीज पुरवठा होणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment