Search This Blog

Friday 2 December 2022

7 डिसेंबरला ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

 

7 डिसेंबरला ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

चंद्रपूर, दि. 2 : दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणून संपुर्ण देशात साजरा केला जातो. यानिमित्त  सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाची सुरवात जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत 7 डिसेंबर 2022 रोजी नियोजन भवन येथे करण्यात येणार असून याप्रसंगी माजी सैनिक मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

            यावेळी ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना तसेच शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शैर्यचक्र प्राप्त सैनिक यांचा भेटवस्तु, स्मृतीचिन्ह व प्रशस्ती पत्र देवून सन्मान करण्यात येणार आहे.

            कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील माजी सैनिक व नागरिकांनी देखील यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

000

No comments:

Post a Comment