Search This Blog

Tuesday, 13 December 2022

19 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

                        19 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 13 : जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे डिसेंबर महिन्याचा लोकशाही दिन 19 डिसेंबर 2022 रोजी  सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात येत आहे.

या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाबी आणि विहीत अर्जात नसलेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी, ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन  वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारच्या 15 दिवसापूर्वी विहित नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत जिल्हा  महिला  व बालविकास अधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येईल. जेणेकरुन, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनास तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबधित विभागाला सदर तक्रार अर्ज पाठविण्यात येईल. तसेच तालुकास्तरीय अर्ज प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी बाल विकास प्रकल्प  अधिकारी कार्यालय येथे स्विकारण्यात येतील, विहित अर्जाचा नमूना महिला लोकशाही दिनाला मिळेल, असे जिल्हा  महिला  व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment