Ø कृषी विभागातर्फे अभ्यास दौऱ्याचे आयोजन
चंद्रपूर, दि. 6 : चंद्रपूर उपविभागातील चंद्रपूर, बल्लारपूर, मुल व सावली या तालुक्यातील 60 शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होत पुणे जिल्ह्यातील बारामती येथे प्रगत शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देवून आधुनिक शेतीचे तंत्र जाणून घेतले.
शेतकऱ्यांनी पाच दिवसाच्या प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र, माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती येथील खजूर बाग पाहणी, फार्मर प्रोड्यूसर कंपनी माळेगाव येथे भेटी दिल्या. तसेच राष्ट्रीय अजैविक स्टेटस प्रबंधन संस्था माळेगाव, व दौंड येथील आय. एन. आय. फार्म शीतगृह, एकात्मिक पीक पद्धत पाहणी केली. प्रगत शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व नियंत्रित शेतीची माहिती घेतली.
चंद्रपूर येथील उपविभागीय कृषी कार्यालयाच्या वतीने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील बारामती येथे दि. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत शेतकऱ्यांचा प्रक्षेत्र प्रशिक्षण अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. दौऱ्यामध्ये येणारे प्रत्यक्ष अनुभव घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत प्रयोग करून अवलंब करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सी. एस. ठाकरे यांनी केले.
सदर प्रशिक्षण दौऱ्याला तालुका कृषी अधिकारी श्री. ठाकरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. याप्रसंगी मुलचे तालुका कृषी अधिकारी बी.एम.गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यास शेतकऱ्यांसोबत कृषी पर्यवेक्षक दिनेश पानसे, कृषी सहाय्यक श्री.पवार, बी. एन. गायकवाड, श्री.कुटे आदी कर्मचारी उपस्थित होते. तर प्रशिक्षण दौरा यशस्वी करण्यासाठी कार्यालयातील तंत्र अधिकारी मनीषा दुमाने, कृषी अधिकारी रोहिणी पेंदोर, कृषी सहाय्यक सोनाली घुगरे, आर. यु. गायकवाड यांनी सहकार्य केले.
0000
No comments:
Post a Comment