Search This Blog

Friday 9 December 2022

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 9 : नांदगाव पोडे, वाघमारे फटाका सेंटर जवळ ता. बल्लारपूर येथे एक अनोळखी पुरुष इसम वय अंदाजे 55 वर्ष असून मृत अवस्थेत कुजलेल्या स्थितीत आढळून आला आहे. मृत इसमाची ओळख  पटविण्याचे आवाहन चंद्रपूर, शहर पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे.

सदर व्यक्तीचे वय अंदाजे 55 वर्ष असून सावळा रंग, उंची 5 फुट 4 इंच, केस पांढरे, चेहरा गोल, सडपातळ बांधा, गळयात काळा धागा, पाढंऱ्या धातुचे चेन, कमरेला काळया रंगाचा धागा, कपाळावर उजव्या डोळयाचे वर जुनी जखम असून टाके मारल्याचे निशाणी, अंगात  निळ्या रंगाचा जिन्स पँट परीधान केलेला आहे.  या वर्णनावरून सदर मृत अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर  शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment