Search This Blog

Thursday 1 December 2022

ग्रामपंचायत निवडणूक : नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्यास परवानगी

 

ग्रामपंचायत निवडणूक : नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्यास परवानगी

Ø  राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना

चंद्रपूर, दि. 1 : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम -2022 अंतर्गत इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून ग्रामपंचायत सदस्य व थेट सरपंच पदासाठी  पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची परवानगी निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

राज्यातील 7751 (चंद्रपूर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 59 ग्रामपंचायती) ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत पुर्वी संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात सुधारणा करण्यात येवून राज्य निवडणूक आयोगाने दि. 1 डिसेंबर 2022 च्या पत्रान्वये सर्व जिल्हाधिकारी त्यांचे अधिनस्त सर्व निवडणूक अधिकारी आणि संबंधितांना पारंपारिक पद्धतीने (ऑफ लाईन) नामनिर्देशनपत्र स्विकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्राप्त  करून घ्यावेत. सदर ऑफलाईन नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये भरू घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित तहसिलदार यांचेकडे सोपविण्यात आली आहे, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.

००००

No comments:

Post a Comment