12 डिसेंबर रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटिस मेळाव्याचे आयोजन
चंद्रपूर, दि. 9 : शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथील कौशल्यम सभागृह येथे दि. 12 डिसेंबर 2022 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये धृत ट्रान्समिशन औरंगाबाद, आर्म्स इंडिया पुणे, सुझुकी मोटर्स गुजरात आणि इतर नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शिकाऊ उमेदवाराकरिता निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार स्टायफंड व कंपनीतर्फे सोयी-सुविधा उपलब्ध राहतील.
या शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्यात टर्नर, फिटर, मोटार मेकॅनिकल व्हेईकल, वायरमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मशिनिस्ट, मेकॅनिकल ट्रॅक्टर, मेकॅनिकल डिझेल तसेच एन.सी.वी.टी मार्फत टेक्निकल ट्रेड केलेल्या सर्व उमेदवारांसाठी जागा उपलब्ध आहे.
पात्रता धारक उमेदवारांनी त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, व्यवसाय प्रमाणपत्र तथा इतर आवश्यक प्रमाणपत्रांसह 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्य सभागृहात उपस्थित राहुन उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बि.टी.आर.आय. सेंटरच्या सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment