Search This Blog

Monday, 12 December 2022

कारपेट व्हिविंग प्रशिक्षण कार्यक्रम

 

कारपेट व्हिविंग प्रशिक्षण कार्यक्रम

Ø युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 12 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूरद्वारे पुरस्कृत 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या सर्वसाधारण गटातील युवक व युवतींकरीता दि. 21 डिसेंबर ते 20 जानेवारी 2023 (एक महिना) कालावधीचे कारपेट व्हिविंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण रोज सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजताच्या कालावधीत पार पडणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये चटई,सोफा खुर्ची, आदी साहीत्यावरील आच्छादने विणने व नक्षीकाम करणे, लोकर व कपडयानुसार गालीचे तयार करणे तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी आदी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी 20 डिसेंबरपर्यंत  www.mced.co.in  या वेबसाईटवर अर्ज करावा. सदर प्रशिक्षणाच्या मुलाखतीकरिता दि. 20 डिसेंबर 2022  रोजी  सकाळी 11  वाजता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन,दुसरा मजला,गाळा क्र.208,बस स्टँन्ड समोर, चंद्रपूर येथे आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका व पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर राहावे. अधिक  माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड (मो.नं. 9403078773, 07172-274416)  कार्यक्रम आयोजक स्मिता पेरके (मो.नं. 9175229413) यांच्याशी संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment