मुक व बधीर शाळेतील विद्यार्थ्यांनी
हाव-भाव द्वारे केले संविधान उद्येशिकाचे वाचन
चंद्रपूर, दि. 1 : संविधान दिनानिमित्त जनजागृती अभियान अंतर्गत विधी सेवा प्राधिकरणद्वारे निवासी मुक व बधीर विद्यालय, चंद्रपूर येथे आज कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थानी संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले. विशेष म्हणजे विद्यार्थाना बोलता व ऐकता येत नसतानाही त्यांनी शिक्षकांच्या मदतीने हाव-भाव करून उद्देशिकेचे वाचन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. सुमित जोशी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. बल्की प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी न्या. सुमित जोशी यांनी संविधानाचे महत्व, नागरिकांचे मुलभुत अधिकार व हक्क याबाबत माहिती दिली. तर समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म यांचे मार्गदर्शनानुसार सदर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मुकबधीर विद्यालय संस्थेचे सचिव श्री. वराडे, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
०००००००
No comments:
Post a Comment