Search This Blog

Wednesday 14 December 2022

प्रस्तावित नूतन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 275 झाडे लावण्यात येणार

 


 प्रस्तावित नूतन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 275 झाडे लावण्यात येणार

Ø मनपाकडून 55 झाडे तोडण्याची रीतसर परवानगी

चंद्रपूर, दि.14 : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत प्रस्तावित आहे. बांधकामात अडथळा असणारी 55 झाडे सध्यास्थितीत तोडण्यात येत असली तरी नूतन इमारत परिसरात तब्बल 275 नवीन झाडे लावण्यात येणार आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास 51.69 कोटीची प्रशासकीय मान्यता दि. 5 मार्च 2021 रोजी प्राप्त झाली आहे. सदर कामाची निविदा निश्चित होऊन 4 जुलै 2022 रोजी कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले. इमारत बांधकामाच्या वास्तु मांडणी आराखड्यामध्ये येणारी 55 झाडे तोडण्याची रीतसर परवानगी चंद्रपूर शहर महानगरपालिका, आयुक्त यांच्याकडून त्यांचे कार्यालयीन पत्र क्र. चंशमनपा/उद्यान विभाग/वृक्ष प्राधिकरण/2022/2764,दि.8 डिसेंबर 2022 अन्वये घेण्यात आली असून त्यानुसार सद्यस्थितीत खोदाई कामात येणारी 30 झाडे तोडण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. सदर परवानगीच्या अटीनुसार तोडण्यात येणाऱ्या एकूण 55 झाडाऐवजी नवीन 275 झाडे सदर परिसरात या विभागामार्फत लावण्यात येणार आहेत. त्यानुसार पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची आवश्यक खबरदारी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment