मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त
5 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात
Ø मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम व राजकीय पक्षाची आढावा बैठक
चंद्रपूर, दि. 1 : भारत निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर विभागीय आयुक्त यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत त्यांच्याकडून जिल्ह्यात एकूण तीन भेटी देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त, नागपूर ह्या सोमवार दि. 5 डिसेंबर 2022 रोजी चंद्रपूर येथे प्रथम भेटीसाठी येणार आहे. याच दिवशी दुपारी 12 वाजता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मतदार यादी निरीक्षकांकडून देण्यात येणा-या तीन बैठकीमध्ये, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे दावे व हरकती सादर करण्याच्या कालावधीत पहिली भेट, दावे व हरकती निकाली काढण्याच्या कालावधीत दुसरी भेट तर मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या कालावधीत तिसरी भेट द्यावयाची आहे. सदर भेटीमध्ये मतदार याद्यांचे निरीक्षण करावयाचे आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment