Search This Blog

Thursday, 1 December 2022

गावक-यांच्या सहभागातून अभियान राबवावे - विवेक जॉन्सन

 

गावक-यांच्या सहभागातून अभियान राबवावे - विवेक जॉन्सन

Ø ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

चंद्रपूर, दि. 1 :  "स्वच्छ जल से सुरक्षा अभियान" दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधित देशभर राबविण्यात येत असून चंद्रपुर जिल्हा परिषद अंतर्गत अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आला.    

शासकीय योजनांचे विविध अभियान गावस्तरावर यशस्वी करायचे असेल तर गावक-यांचा सहभाग आवश्यक आहे. ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान जिल्हातील प्रत्येक गावात राबवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) मंगेश आरेवार यांनी केले. अभियान चंद्रपुर जिल्यात कसे राबवायचे व त्याचे महत्व याबाबत त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून  जिल्हा परिषदचे अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर उपस्थित होत्या. "स्वच्छ जल से सुरक्षा अभियान" जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग व आरोग्य विभाग यांनी समन्वयातुन या अभियानाचे काम करावे, असे मत गौरकर यांनी व्यक्त केले. पाणी गुणवत्ता तज्ञ अंजली डाहुले यांनी अभियानाबाबतचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रकाश उमक यांनी केले. कार्यक्रमाला पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता, बीआरसी, संस्थेचे प्रतिनिधी माहिती शिक्षण संवाद तज्ञ प्रविण खंडारे, कृष्णकांत खानझोडे, अंजली डाहुले, प्रफ़ुल मत्ते ,साजिद निजामी, त्रृशांत शेडे, नरेन्द्र रामटेके, भारती करसाल, बंडु हिरवे, दानप्पा फ़ाये, मनोज डांगरे , स्नेहा रॉय,  श्रध्दा जयस्वाल, उपअभियंता आत्राम, शामकुवर, योगिता ठेंगणे आदी उपस्थित होते.

००००००

 

No comments:

Post a Comment