Search This Blog

Friday, 23 December 2022

सुशासन सप्ताहाच्या निमित्ताने विभागांनी उत्कृष्ट कार्य व नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती सादर करावी -निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम


 सुशासन सप्ताहाच्या निमित्ताने विभागांनी उत्कृष्ट कार्य व नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती सादर करावी -निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम

Ø "प्रशासन गाव की और" या पोर्टलवर माहिती सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 23: 19 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सुशासन सप्ताहाचे औचित्य साधून विभागांमार्फत सर्वसामान्य जनतेसाठी राबविले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, सेवा व योजना तसेच उत्कृष्ट कार्याची व नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती प्रशासन गाव की और या पोर्टलवर सादर करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी दिल्या.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात सुशासन सप्ताहानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, अधिक्षक भूमी अभिलेख प्रमोद गाडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बंडू रामटेके, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, नायब तहसीलदार श्रीमती उत्तरवार तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. सुशासन दिवसाचे औचित्य साधून शासनातर्फे 19 ते 25 डिसेंबर हा सप्ताह सुशासन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांसाठी आपल्या विभागामार्फत सुशासन संबंधात केलेल्या उत्कृष्ट कामाची, वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती व संबंधित फोटो "प्रशासन गाव की और" या पोर्टलवर सादर करावेत.

कृषी विभागामार्फत वनराई बंधारे, महानगरपालिकेमार्फत स्वच्छता मोहीम, भिंती चित्र, वृक्षपेंटिंग, बुक डिलिव्हरी यासारखे उपक्रम, आरटीओ मार्फत "हॅलो आरटीओ" मोहीम, जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना यासारख्या उपक्रमांची माहिती शासनास सादर करावयाची आहे. त्याअनुषंगाने विभागांनी माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, असा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी बैठकीत दिल्या.

000000

No comments:

Post a Comment