Search This Blog

Monday, 26 December 2022

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

 एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

Ø 31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 24: सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभाग, नागपूर अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल येथे इयत्ता 6 वी प्रवेशाकरीता व इयत्ता 7 वी ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरण्यासाठी दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, जांभुळघाट ता.चिमूर येथे स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षेकरीता आवेदन करण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी 2023 आहे.

सदर स्पर्धा परीक्षेकरीता 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी तसेच इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मान्यताप्राप्त शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व इतर प्राथमिक, माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमाती व आदीम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून आवेदन पत्र मागविण्यात येत आहे. आवेदन पत्राचा नमुना नजिकच्या शासकीय आश्रमशाळेत, शासकीय मुला-मुलींचे वस्तीगृह व प्रकल्प कार्यालय, चिमूर येथे उपलब्ध आहे.

परीक्षेकरीता आवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 6लक्ष पेक्षा कमी आहे, अशा अनुसूचित जमाती व आदिम जमातीचे विद्यार्थी सदर परिक्षेकरिता पात्र राहतील. असे चिमूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment