धान खरेदीकरीता 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
Ø शेतकऱ्यांनी केंद्रावर जाऊन धानाची विक्री करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 21 : शासन निर्णयान्वये, खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीकरीता 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. धान खरेदी करीता उर्वरीत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदीचा अंदाज बघता शासन निर्णयानुसार दि 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असून धान खरेदीकरीता दि.28 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत केंद्रावर जाऊन आपल्या धानाची विक्री करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment