Search This Blog

Friday 3 February 2023

मुल शहरात सिमेंट रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी 5 लक्ष 28 लक्ष रुपये मंजूर

 मुल शहरात सिमेंट रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी 5 लक्ष 28 लक्ष रुपये मंजूर

Ø पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

चंद्रपूर, 3 : बल्लारपूर मतदार संघात येत असलेल्या मुल शहरातील अंतर्गत रस्ते मजबूत होणार असून सांडपाणी व्यवस्थापन अधिक सुरळीत होणार आहेत. याकरिता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वनसांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन व सतत पाठपुरावा केल्यामुळे 5 कोटी 28 लक्ष 16 हजार 661 रुपये मंजूर करवून घेतले आहेत. राज्याच्या नगर विकास विभागाकडे याबाबत श्री. मुनगंटीवार यांनी मागणी केली होती. त्यानुसार 1 फेब्रुवारी रोजी नगर विकास विभाग, मंत्रालयाकडून आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

यासंदर्भात श्री मुनगंटीवार म्हणाले की, या विकासकामांच्‍या माध्‍यमातून मुल शहराच्‍या वैभवात अधिक भर घातली जाणार आहे. या आधीही मुल शहरात सिमेंट रस्‍त्‍यांचे बांधकामअंतर्गत रस्‍ते व नाल्‍यांचे बांधकामकर्मवीर मा.सा. कन्‍नमवार यांचे स्‍मारक व सभागृहाचे बांधकामपं. दिनदयाल उपाध्‍याय इको पार्कचे बांधकामआदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहमाळी समाजाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी स्‍वतंत्र वसतीगृहाचे बांधकामडॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकामऔद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत अतिरिक्‍त कार्यशाळेचे बांधकामक्रीडा संकुलाचे बांधकामजलतरण तलावाची निर्मितीशहरात पंचायत समितीची अत्‍याधुनिक इमारततहसील कार्यालयाची अत्‍याधुनिक इमारतशहरातील बसस्‍थानकाचे अत्‍याधुनिकीकरण व नुतनीकरणशहरात 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना अशी विकासकामांची मोठी मालिका आम्‍ही तयार केली आहे.

मुल शहराच्या सर्वांगीण विकासाला मी प्राधान्य देतोय. शहरातील पायाभूत सुविधानागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शैक्षणिकसांस्कृतिक वातावरण उत्तम असावे, यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापुढेही विविध विभागातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

००००००

No comments:

Post a Comment