Search This Blog

Thursday, 9 February 2023

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन




 

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 9 : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्हास्तरीय अधिकारी / कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

9 ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहे. सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम.

उपस्थित होते.

15 पंचायत समिती अंतर्गत अधिकारी / कर्मचारी तसेच मुख्यालयातील अधिकारी / कर्मचारी हे क्रिकेटकबड्डीखो-खो, व्हॉलीबालबॅडमिंटनकॅरमफुटबॉलधावणे (4x100200 मी400 मी. 800 मी. 1200 मी. 400 मी. हर्डल रेस) बुध्दीबळपोहणेलांब उडीगोळा फेकटेबल टेनीस इत्यादी क्रीडा प्रकारात तसेच सांस्कृतीक कार्यक्रम वैयक्तीक गायनसांघिक गायनवैयक्तीक नृत्यसांघिक नृत्यप्रबोधनात्मक लघु एकांकिकानकलावाद्य वादन स्पर्धा व चित्रकला इत्यादी स्पर्धामध्ये सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) श्याम वाखर्डे यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडेशिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाणउपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम शिंदेमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी धर्मराव आत्राम,

कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु) हर्ष बोहरेकार्यकारी अभियंता (बांधकाम)र मेश शंभरकरकृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडकेसमाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर,

जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रियंका रायपुरेउपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, निखिता ठाकरेतसेच 15 पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी स्पर्धक उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment