Search This Blog

Thursday 23 February 2023

सुशिक्षित बेरोजगारांकरिता पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत


सुशिक्षित बेरोजगारांकरिता पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत

25 व 26 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्‍याचे आयोजन

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

चंद्रपूर, दि.23 : राज्‍याचे वनेसांस्‍कृतिक कार्यमत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पंतप्रधान रोजगार निर्मीती कार्यक्रम अंतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्‍यामार्फत रोजगार निर्मीतीकरिता कृषी महोत्‍सव चंद्रपूर येथे जनजागृती मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे.

दिनांक 25 व 26 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2 वा. चांदा क्‍लब ग्राऊंड नागपूर रोड वरोरा नाकाचंद्रपूर येथे सुशिक्षित बेरोजगारांकरिता रोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये खादी व ग्रामोद्योग आयोग यांचे तज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. मध्‍ये सेवा उद्योगाकरिता कमाल मर्यादा 20 लाख रूपये व निर्माण उद्योगसाठी कमाल मर्यादा 50 लाख रूपयापर्यंत बॅंकेमार्फत कर्जाची तरतूद करण्‍यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागासाठी 15 टक्‍के ते 35 टक्‍के सबसिडीची तरतूद आहे.

यामध्ये खनिज आधारित उद्योगवन आधारित उद्योगकृषी आधारित उद्योगपॉलिमर व रसायन आधारित उद्योगअभियांत्रिकी व अपारंपारिक उर्जेवर आधारित उद्योगतसेच सेवा आधारित उद्योग या विषयावर खादी व ग्राम उद्योग आयोग येथील तज्ञांकडून मार्गदर्शन तसेच बँकर्स कडून लोन संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ तरूणांनी घ्‍यावाअसे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment