Search This Blog

Sunday, 19 February 2023

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तदान व श्रमदान शिबीर





छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तदान व श्रमदान शिबीर

चंद्रपूरदि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विकृतीशास्त्र व नर्सिंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व श्रमदान शिबिर घेण्यात आले.

 या शिबिरात रुग्णालयातील सर्व नर्सिंग स्टाफमहाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. तसेच जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या माध्यमातून रक्तपेढी 28दत्तनगर 30गडचांदूर 44 व चिंतलधाबा 30 असे एकूण 134 बॅग रक्त संकलन करण्यात आले. एकाच वेळी तीन रुग्णांना रक्त देण्याकरिता सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने सदर रक्त संकलन हे ट्रिपल बॅगमध्ये करण्यात आले.

त्यासोबतचअपघात विभागरुग्णालयातील रिकामा परिसरवार्ड तसेच रुग्णालयाचा कॉरिडोर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी श्रमदान करत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. श्रमदानामध्ये अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरेवैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवनेपरिसेविका अल्का बावनकरसहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुलेश चांदेकरविकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र जांभुळकररक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. भूषण नैतामकार्यालयीन अधीक्षक चतुरदास पाटीलराहुल येरेवारविशाल बिराजदारसंतोष गोरेवारनिखिल वाडीकरसुनील वाडकरराज शेंद्रेकिशोर भांगेश्री.कुडगारकर आदींचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभले.

तत्पूर्वीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्याच्या राज्य गीताचे गायन करण्यात आले.

०००००००

No comments:

Post a Comment