Search This Blog

Friday 24 February 2023

राज कपूर, व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कारासह विशेष योगदान पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात येणार

                                


 राज कपूर, व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कारासह

विशेष योगदान पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात येणार

Ø सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई / चंद्रपूरदि. 24 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मनोरंजन क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दरवर्षी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार तसेच व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.  या पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

यापूर्वी राज कपूर जीवनगौरव आणि व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये रोखमानपत्रसन्मानचिन्ह असे होते. आता यापुढे या पुरस्काराचे स्वरुप 10 लाख रुपये रोखमानपत्र आणि सन्मानचिन्ह असेल. याशिवाय राज कपूर आणि व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप यापूर्वी 3 लाख रुपये रोखमानपत्र आणि सन्मानचिन्ह असे होते. आता या पुरस्काराचे स्वरुप 6 लाख रुपये रोखमानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एका आयोजित कार्यक्रमात लवकरच 20202021 आणि 2022 असे तीन वर्षांचे पुरस्कार वितरीत केले जातील, अशी माहितीही श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

राज कपूर जीवनगौरव पुरस्कारव्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार व विशेष योगदान पुरस्कार निवड समितीची बैठक नुकतीच ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेदादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणेपु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्यासह दोन्ही पुरस्कार निवड समितीचे सदस्य दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीदिग्दर्शक मधुर भांडारकरराजदत्तचंद्रप्रकाश द्विवेदीनीना कुलकर्णी उपस्थित होते.

००००००



No comments:

Post a Comment