Search This Blog

Friday, 24 February 2023

28 फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 28 फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय

रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर, दि. 24: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपुरी येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये इलेव्हेंट रिअल इस्टेट चंद्रपूर, अॅलेक्सी मुच्युअल फंड निधी लिमी. अंतर्गत सेल्स ऑफीसर, सेल्स मॅनेजर, बँच मॅनेजर, टॅलेनसेतू सर्व्हिसेस प्रा.लि.पुणे, वैभव एंटरप्रायजेस नागपूर, परम स्किल ट्रेनिंग इंडिया औरंगाबाद, जयदुर्गा ऑटोमोबाइल ब्रम्हपुरी, एसबीआय लाइफ, उषा कन्सल्टन्सी नागपूर, नवकिसान बायोप्लॅटिक लिमीटेड, एल.अँड.टी कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इंस्टीट्यूट पनवेल मुंबई, उत्कर्ष स्मॉल फायनास बँक नागपूर, स्पाटलाइट कन्सल्टन्सी ठाणे आदी कंपन्या सहभागी होणार आहे. या कंपनीमार्फत 748 जागा कंपनीमार्फत भरल्या जाणार आहे.

उमेदवारांनी मेळाव्याकरीता आधारकार्ड व शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://rajgar mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करुन ऑनलाईन अप्लाय करावे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172-252295 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे,

00000

No comments:

Post a Comment